मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपमेंट कोर्स

ज्ञानदा डॉट ऑनलाईन चा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती तंत्रज्ञान (IT) शिकवणे हा आहे.


या दृष्टिने मोबाईल एप्लिकेशन्स तयार करणे जी काळाची गरज आहे ते मातृभाषेतून आपणासाठी अतिशय माफक शुल्कामध्ये उपलब्ध करुन देत आहे.
या कोर्स मधून कोणीही व्यक्ति ज्याच्या मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे उत्तम प्रकारचे मोबाईल एप्लिकेशन कोणतेही प्रोग्रॅमींगची माहीती नसतानाही अगदी सहजरित्या तयार करु शकतो.
या कोर्सचा मूळ हेतू तरुणांना त्यांच्या मातृभाषेत विकसित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन फायदेशीर रोजगार मिळवून देण्यासाठीचे पहिले पाऊल हा आहे.
मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपमेंट कोर्समधून साधे सोपं मोबाईल एप्लिकेशन्स तयार करणे ते मोबाईलमध्ये इंस्टॉल करुन टेस्ट करणे तसचं इतराना शेअर करणे सहजरित्या करु शकता.
कोर्सच्या सुरुवातीला आपणास मोबाईल एप्लिकेशन्स बाबत अतिशय उत्तम प्रकारची माहीती देण्यात आली आहे. मोबाईल एप्लिकेशन्सचे प्रकार, त्यांचा वापर कोठे कोठे मोठ्या प्रमाणात होतो. मोबाईल एप्लिकेशन्सचा इतिहास, व्याख्या, मोबाईल एप्लिकेशन्स तयार करण्याचे विविध टूल्स या सर्वांची माहिती देण्यात आली आहे. ज्यामूळे आपणास मोबाईल एप्लिकेशन्सचा विस्तृत दृष्टिकोण नजरे समोर येतो.


ज्या टूल चा वापर या कोर्समध्ये मोबाईल एप्लिकेशन्स तयार करण्यासाठी करण्यात आला आहे त्याची विस्तृत माहिती आपणास देण्यात आली आहे जेणे करुण कोणाही नवख्या व्यक्तिस या टूल्सची प्राथमिक माहिती मिळू शकेल आणि एप्लिकेशन्स तयार करण्यासाठीची साधी सोप्पी पद्धत समजू शकेल.
या कोर्समध्ये आपण छोटी छोटी मोबाईल एप्लिकेशन्स तयार करुन मोबाईलमध्ये टेस्ट किंवा शेअर करु शकता.


या कोर्समध्ये पुढील एप्लिकेशन्सचा समावेश करण्यात आला आहे.
उदा. सिंगल स्क्रिन एप्लिकेशन, मल्टीपल स्क्रिन एप्लिकेशन, मोबाईल एप मधून कॉल सिस्टिम तयार करणे, वेबसाईटवर जाणे (वेबसाईट लिंकींग), एप मध्ये वेबसाईट ओपन करणे, ऑडीओ – व्हिडीओचा करुन मोबाईल एप्लिकेशन तयार करणे, फोटो काढून शेअर करणे, एपमध्ये डाटाबेस चा वापर करणे, वेळ तारीख दाखवणे, स्वतासाठी टू डु लिस्ट तयार करणे, डिजीटल सिग्नेचर तयार करणे, रंगबिरंगी मोबाईल स्कि्रन्स, मोबाईल एप स्क्रिन डिझाईन करणे, मोबाईल एप टेस्टिंग करणे, मल्टीपल वेबसाईट लिंकींग करुन मिनी प्रोजेक्ट करणे अशा विविध प्रकारच्या मोबाईल एप्लिकेशन्स चे साध्या सोप्या मराठी भाषेतून सादरीकरण करण्यात आले आहे. या कोर्सचे प्रत्येक एप्लिकेशन आपण अगदी सहजरित्या तयार करु शकता.
सर्व एप्लिकेशन्स तयार केल्यानंतर याच प्रॅक्टिसवर आधारीत तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट मोबाईल एप्लिकेशन्स माहितीही देण्यात आली आहे.
तसेच हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कोणत्या प्रकारची मोबाईल एप्लिकेशन्स (प्रोजेक्टस्) तयार करु शकता याची माहीती देण्यात आली आहे.
कोर्स पूर्ण केल्यानंतर आपणास फायनल प्रोजेक्ट तयार करण्यासाठी खास मार्गदर्शनही केले जाणार आहे. तसेच कोर्सचे तंत्रशिक्षण घेत असताना काही शंका अडचण येत असल्यास त्यासाठी ऑनलाईन सोय करण्यात आली आहे.
चला तर शिकू या मोबाईल एप्लिकेशन तयार करायला ज्ञानदा डॉट ऑनलाईनच्या साथीने …

Shopping Cart